मुंबई दि.१८: मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव (साहित्य शाखा) व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल (कार्यक्षेत्र महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे निमंत्रितांच्या हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहॆ. या कविसंमेलनामध्ये नितीन वरणकार (शेगाव-बुलढाणा), प्रा. संजय कावरे (मंगरूळपीर-वाशिम), प्रवीण सोनोने (दारव्हा-यवतमाळ), प्रा.महादेव लुले (तिवसा-अकोला), अमोल चरडे(पुणे), प्रवीण बोपुलकर (पनवेल) हे कवी आपल्या कविता सादर करतील याप्रसंगी ‘महाराष्ट्राचा हास्य कवी स्पर्धा २०२४’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमसुद्धा संपन्न होणार आहे. कार्यक्रमास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा प्रा. उषा तांबे, प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव, साहित्य शाखा कार्यवाह अशोक बेंडखळे, शब्दवेल साहित्य संघाचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर व सचिव अश्विनी अतकरे तसेच सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल चे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख विलास पुंडले यांनी केले आहॆ.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!