दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे राबवलेल्या द्रोणागिरी गडावरील शोध मोहीम चे फलित…
उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे) दुर्ग मावळा प्रतिष्ठान साधरण दोन वर्ष द्रोणागिरी गडावर श्रमदान मोहिमे द्वारे सातत्यपूर्ण संवर्धन कार्य राबवत आहे. याच संवर्धन कार्यास अनुसरून गेल्या काही दिवसात सातत्याने शोध मोहीम राबवल्या जात होत्या. उरण मधील जुने जाणकार तसेच प्रतिष्ठान मधील स्थानीक सदस्य व संवर्धन विभाग प्रमुख व उरण विभाग प्रमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर होतकरू सदस्यांनी सहभाग घेत काही इतिहासकालीन जुने अवशेष हुडकून काढले आहेत. त्यामुळे उरणच्या इतिहासात आता नक्कीच नवीन माहितीची, ज्ञानाची भर पडणार आहे. शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक अनेक गुप्त गोष्टींचा उलगडा होण्यास यामुळे मदत होणार आहे. आतापर्यंत दुर्ग मावळा प्रतिष्ठानने अनेक मोहिमा द्रोणागिरी किल्ल्यावर राबवून,  स्वच्छतेचे काम हातात घेऊन किल्ल्यावरील अनेक बाबी उजेडात आणल्या आहेत.दुर्ग मावळ्यांनी केलेल्या पायवाट मुळे  सरळ किल्ल्यावर जाणे आता सोप्पे झाले आहे.एकंदरीतच अनेक महत्वाची कामे दुर्ग मावळाने या द्रोणागिरी किल्ल्यावर केले आहे. त्याच्या या कार्याचे फलित म्हणून अनेक नवीन अवशेष या किल्ल्यावर सापडले आहेत.

सापडलेले अवशेष
🔸पाण्याचे ६ टाके
🔸 तळाव ५ त्यातील ४ तलाव २० वर्षे पूर्वी फॉरेष्ट च्या अधिकाऱ्याने खोदले आहेत आणि १ तलाव हा प्राचीन आहे
🔸एक गुफा ज्याच्या मध्ये पाण्याचा  टाका आहे.
🔸 जुन्या बांध कामाचे अवशेष जे आज सुद्धा ३,४, फूट उंच शाबूत आहेत.

लवकरच याठिकाणी परिवाराच्या माध्यमांतून संवर्धन कार्य सुरू होणार आहे.सदर मोहिमेत सुजित खैरे, गणेश तांडेल, गणेश भोईर,गणेश माळी, राज म्हात्रे, लक्ष्मण कातकरी, विजय कातकरी, अजय कातकरी आदी सदस्य सहभागी होते. पुन्हा एकदा स्थानीक होतकरू सद्यस्यांच्या वाखाणण्याजोग्या दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या शोध मोहिमेच्या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा निरपेक्ष भावनेने प्रसार व प्रचार करणे, गड किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण करणे हे दुर्गमावळा प्रतिष्ठानचे मुख्य उद्दिष्ट व ध्येय असल्याचे मोहिमेदरम्यान उपस्थित असलेले दुर्गमावळा प्रतिष्ठानचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश तांडेल यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!