पनवेल दि.8: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान रुपेश पावशे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने यंदाचा ‘राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
       पैलवान रूपेश शिवराम पावशे पनवेल तालुक्यातील नितळस गावचे आहेत. २००२ पासून कुस्तीला सुरुवात करून अनेक स्पर्धा मैदाने गाजवून रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव राज्यस्तरावर त्यांनी गाजविले आहे. त्यांनी कुस्तीमध्ये अनेक पारितोषिके, मानसन्मान मिळविले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
           मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे  राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने १२ नोव्हेंबरला संपन्न होणार आहे. तसेच प्रत्यक्ष पुरस्कार वितरण कार्यक्रम मुंबई, पुणे व नाशिक या ठिकाणी शासनाच्या नियमांनुसार व वेळापत्रकानुसार होणार आहे, अशी माहिती अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. कृष्णाजी जगदाळे यांनी दिली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!