उरण दि.१४: केंद्रसरकारची कामगारांसाठीची ध्येय धोरणं सतत बदलत असतांना कामगारांची नोकरी टिकवून त्यांचे जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत हे आपल्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून करत असतात. सध्या कंटेनर फ्रेट स्टेशन (CFS) च्या कामगारांची वाईट अवस्था आहे. परंतु कंपनी व कामगार यांच्यामधे समतोल राखत कामगार नेते महेंद्र घरत हे मध्यस्थी करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. ओल्ड मर्स्क जे.एन.पी.टी. येथील कामगारांच्या पगारवाढीचा करार ११ मार्च रोजी संपन्न झाला.
या करारनाम्यानुसार कामगारांना ८ वर्षासाठी १८००० रुपये पगारवाढ, LTA – ११००० रुपये मेडीक्लेम पॉलीसी ३ ते ५ लाख रुपयांची. तसेच दरवर्षी बोनसमध्ये २००० ते २७५० रुपये वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या करारनाम्याप्रसंगी न्यू मँरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील तर मर्स्क कंपनीचे एच आर हेड योगेश ठाकूर, फ्युचर्झ स्टफिंगचे COO चिराग जागड तर कामगार प्रतिनिधी प्रशांत पाटील व मेघनाथ ठाकूर उपस्थीत होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!