पनवेल दि.११ (संजय कदम) पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का परिसरात एका २७ वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या ४८ तासांत अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात आरोपी मोबाईल फोन वापरत नव्हता तरीही पोलिसाना त्याचा शोध घेण्यात यश आले.
पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरी समोर राहणाऱ्या विकी चिंडालिया (वय २७) या तरुणाची अज्ञात इसमाने धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी केलेल्या सुचनेनुसार व पोलीस उपआयुक्त पंकज डाहणे, परि ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपुत, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल शहर पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान, सपोनि प्रकाश पवार, बजरंग राजपुत, पोउपनि अभयसिंह शिंदे व पोलीस अंमलदार असे तीन वेगवेगळे पोलीस पथक तयार करून. पथकातील सपोनि प्रकाश पवार, पोउपनि अभयसिंह शिंदे व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त करुन तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रिक तपासावरुन सदरचा गुन्हा हा सचिन अरुण शिंदे (रा. बौद्धवाडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याने केला असून तो अस्तित्व लपविण्यासाठी मुळ गावी पळून गेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार सपोनि राजपुत व पोलीस पथक यांच्याशी समन्वय राखुन आरोपीला मूळ गावातून अटक करून अवघ्या ४८ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!