महापालिकेच्यावतीने शिलाफलक व स्वातंत्रसैनिकांच्या कुटूंबियांचा गौरव
स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून 75 वृक्षरोपांची लागवड

पनवेल दि.11: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने संपूर्ण राज्यात व देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश अर्थात’ माझी माती माझा देश’ अभियान राबविले जात आहे. आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयामध्ये आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून, राष्ट्रगीत व राज्यगीत तसेच पंच प्रण प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच स्वातंत्र सैनिक आणि शहीद वीरांचा नामोल्लेख असणाऱ्या शिलाफलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर यावेळी मान्यवरांनी या शिलाफलकास पुष्पचक्र वाहिले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून अर्थात 75 देशी वृक्षांचे रोपण करून कळंबोली येथे अमृत वाटिका निर्माण करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून दि.बा पाटील विद्यालयामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून ‘वसुधा वंदन’ कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी लोकनेते दि.बा पाटील शाळेमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये ‘वीरों को वंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत शहीद सैनिक व स्वातंत्रसैनिकांच्या कुटूंबियांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 चे पंकज डहाणे, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त अभिषेक पराडकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबियांना सन्मानीत करण्यासाठी फुलांनी सजवलेल्या गाडीतून सन्मानपूर्वक आणणयात आले. तसेच यावेळी आमदार, आयुक्त तथा प्रशासक, माजी महापौर, पोलिस उपायुक्त यांच्या समवेत सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबियांसाठी अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले होते. अत्यंत भारावलेल्या वातावरणात पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील शहीद सैनिक विष्णु कदम यांच्या पत्नीचा तसेच 26 स्वातंत्रसैनिकांच्या कुटूंबियांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी महापालिकेच्या शाळांचे विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिकाचे नातेवाईक, नागरिक, महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!