माथेरान दि.२६: (मुकुंद रांजणे) सातव्या वर्षात पदार्पण करत असताना दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवून अनेक स्तुत्य उपक्रम मुकद्दर क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित केले जातात. माथेरान मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट उत्सव सुरू असतो. यावेळी अनेक संघ या मैदानावर क्रिकेटचे सामने आयोजित करून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात.
हे प्रोत्साहन देत असताना काहीतरी वेगळी संकल्पना मांडून गावातील होतकरू तरुणांना त्यांच्या आजवरच्या कार्यकाळात केलेल्या अभिनव उपक्रमाला न्याय देण्याचे महत्वपूर्ण कार्य हे केवळ मुकद्दर क्रिकेट संघाच्या माध्यमातून पहावयास मिळते.दि.४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान या संघाने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. यंदाचे या संघाचे सातवे वर्ष असून यावेळी एक उत्तम संकल्पना स्पष्ट केली आहे.शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्यांच्यात आजही धमक आहे आणि सुरुवातीपासून आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंगांना सामोरे जाऊन खडतर आव्हाने पेलून ज्यांनी ज्यांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. जनमानसात आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. कालांतराने सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सुध्दा आपले नाव लौकिक केले आहे अशा संघर्षयोध्या दिग्गजांना दि.६ फेब्रुवारी रोजी “संघर्षाची साथ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ही अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल तसेच या पुरस्कारांसाठी योग्य व्यक्तींची निवड केल्याबद्दल मुकद्दर क्रिकेट संघाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!