रायगड दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे , पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.
यावेळी झालेल्या शानदार संचलन द्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलीस दल पुरुष, महिला, गृहरक्षक दल, वाहतूक विभाग दुचाकीस्वार, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका, अंमली पदार्थ शोधक, श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर सविता गर्जे यांनी केले.
बेटी बचाव बेटी पढाव ही प्रतिज्ञा
यावेळी बेटी बचाव बेटी पढाव ही प्रतिज्ञा मंत्री कु तटकरे यांनी उपस्थिताना दिली. प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे मुलगा मुलगी यांना समान मानेल. स्त्री भ्रूण हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेन. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहीन. बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीते साठी सदैव प्रयत्नशील राहीन.
तसेच यावेळी बेटी बचाव बेटी पढाव संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेल्या फलकावर मंत्री आणि अन्य मान्यवरांनी स्वाक्षरी करून संदेश दिला.
भारतीय संविधान उद्देशिका प्रतीचे वितरण
घरघर संविधान निमित्ताने प्रातिनिधीक स्वरुपात संविधान उद्देशिका प्रतीचे वितरण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड डॉ. भरत बास्टेवाड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना करण्यात आले.


विविध पुरस्कार व सत्कार समारंभ
सर्वोत्कष्ट गुन्हे तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक २०२३ हे जाहीर करण्यात आल्या बद्दल अपर पोलीस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथरे यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
गुणवंत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील एक बहुउद्देशिय पुरूष कर्मचारी व पनवेल महानगरपालिके अंतर्गत एक कर्मचारी अशा १६ गुणवंत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
लेक लाडकी योजना लाभार्थी
अन्वी नितिकेश पाटील
(ग्रामपंचायत नाव – भाल) आणि शिवन्या अविनाश पिंगळे
(ग्रामपंचायत नाव – ताडवागळे)यांना धनादेश वितरण करण्यात आले.
कुष्ठरोगा संबंधित भौगोलिक माहिती प्रणाली (GIS Atlas) पुस्तकाचे प्रकाशन
राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, पनवेल नवी मुंबई व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या कुष्ठरोगा संबंधित भौगोलिक माहिती प्रणाली (GIS Atlas) पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतुन रायगड पोलीस दलास देण्यात आलेल्या वाहनांचे व ड्रोन चे हस्तातरण यावेळी मंत्री कु तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमानंतर मंत्री तटकरे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 76 व्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने आदी मान्यवर व इतर अधिकारी,कर्मचारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 76 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

प्रजासत्ताकदिन सोहळा पनवेल महापालिका मुख्यालयात उत्साहात संपन्न
पनवेल: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आज प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले.
यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल तसेच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. याबरोबर रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल, अग्निशमन दलाचे महिला पुरुष कर्मचाऱ्यांनी मोटार सायकलीवरील विषेश कर्तबगारी दाखविली.
या कार्यक्रमास उपायुक्त कैलास गावडे ,उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे , लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरिक्षक संदिप खुरपे, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक अधिकारी स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.राजू पाटोदकर सर्व विभाग प्रमुख ,अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापालिका कर्मचारी, जेष्ठ नागरिक, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित म्हात्रे यांनी केले.
तसेच महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोगाच्या कायमस्वरूपी निर्मूलनासाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर केले. उपस्थित सर्वांना क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी प्रतिज्ञा देण्यात आली.
शाळांमध्येही राष्ट्रध्वज वंदन संपन्न
तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले.तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली. सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

हुतात्मा स्मारक येथे ध्वजवंदन संपन्न
पनवेल: प्रजासत्ताक दिन निमित्ताने हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार सीमा परांजपे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.
यावेळी प्रमुखा अतिथी म्हणून बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, सर्वात आश्वासक अशी लोकशाही असलेल्या आपल्या देशाकडे
एका बाजूला प्रशिक्षित युवा मनुष्यबळ देणारा म्हणून तर दुसऱ्या बाजूला प्रगतीच्या दाही दिशांमध्ये विकसित होणारा देश म्हणून सारे जग पाहत आहे.
ही भरीव प्रगती होत असताना ज्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागावर, शौर्यावर, हौतात्म्यावर आपण हे सारे मिळविलेले आहे,त्या स्वातंत्रवीरांचे योगदान आपण कधीच ही विसरता कामा नये. त्यांचा आपण सदैव सन्मान करायला पाहिजे. असेही आमदार महोदयांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी पवन चांडक, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड ,मनपा माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण , तहसीलदार विजय पाटील , महापालिका अधिकारी-कर्मचारी,स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माथेरान मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !
माथेरान (मुकुंद रांजणे) माथेरान मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सव्वानऊ वाजता अधीक्षक कार्यालय येथे अधीक्षक सुरेंद्र सिंग ठाकूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नगरपालिका कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. असेंबली हॉल येथे कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे, वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळा येथे सुभेदार कै. विनय विनय धनावडे यांच्या शिल्पास नगरपरिषदेचे सावंत आणि उप शिक्षक संतोष चाटसे यांच्या शुभहस्ते पुष्पहार त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यास लेखापाल अंकुश इचके यांचे शुभहस्ते पुष्पहार, वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास करुणा बांगर यांच्या शुभहस्ते पुष्पहार, स्वातंत्र्य सैनिकांचे स्तंभास कर निर्धारण अधिकारी समीर दळवी यांच्या शुभहस्ते पुष्पहार विर हुतात्मा भाई कोतवाल यांचे निवासस्थानी मेघा कोतवाल यांचे शुभहस्ते ध्वजारोहण, हुतात्मा स्मारक येथे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण, हुतात्मा स्मारक येथे वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी रूपाली मिसाळ यांचे शुभहस्ते पुष्पहार, हुतात्मा स्मारक येथे वीर हुतात्मा भाई कोतवाल स्मारक येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या नाम फलकास नगरपरिषदेचे ज्ञानेश्वर सदगीर यांच्या शुभहस्ते पुष्पहार, हुतात्मा स्मारक येथे वीर हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या शिल्पास लेखापरीक्षक भारत पाटील आणि प्रवीण सुर्वे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमानंतर नगरपरिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी नागरिक,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!