अमरावतीच्या आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन
पनवेल,दि. 10 : अमरावतीचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेल महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज काळी फित लावून लेखणी बंद आंदोलन केले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने उपायुक्त विठ्ठल डाके यांनी अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांना निवेदन दिले.
कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हल्ले करतात, अशा हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याच्या संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावर योग्य उपाय असल्याने, आज महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज काळी फित लावून लेखणी बंद आंदोलन केले.