👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :
- मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
- आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
- समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
- दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
- आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
- वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
- राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
- पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
- खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
- राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
- पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
- किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
- अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
- खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
- मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
- अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
- उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
- कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)
🔸मला लोकांच्या आड येणारे नियम नकोत – मुख्यमंत्री
🔹सिडकोच्या जमिनी आहेत त्या फ्री होल्ड करण्याचा निर्णय
♦️पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स वरील शास्ती माफ