मुंबई दि.१४: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलीयं. ते 57 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कॅन्सर आजाराने ग्रासले होते.
अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.