पनवेल दि.१४: महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धार्मधिकारी यांचे कार्य हे जगाला प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आयटीआयच्या नामांतरण सोहळ्यावेळी काढले. तसेच या ठिकाणी सुरु होणाऱ्या कौशल्य विकास केंद्रालाही तीर्थरूप डॉ. नानासाहेब धार्मधिकारी यांचेच नाव देण्याची मागणी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
पनवेल मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा ऐतिहासीक निर्णय सकरारने घेतला. त्यानुसार हा नामांतरण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अमरीश मोकल, कर्णा शेलार, मनिषा बहिरा, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजय कुमार टीकोळे, वैभव वैशंपायन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुरुवातीलाच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले तसेच पुढे म्हणाले की, पनवेल आयटीआयाला जिल्ह्यात प्रचंड मोठी मागणी आहे. त्यामुळे तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धार्माधिकारी यांच्या नावाची जोड मिळणार असल्याने आयटीआयच्या रुपांतराचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. औद्योगिक शिक्षण क्षेत्रात हे नामांतरण महत्त्वपूर्ण पाऊल असून, या संस्थेच्या माध्यमातून नव्या पिढीला उत्कृष्ट औद्योगिक कौशल्य मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

🛑Mumbai Toll Free: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी
♦️ज्या दिवशी माझ्याहातात मौका येईल त्यादिवशी मी काम करणार – मुख्यमंत्री

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!