मुंबई दि.21: शनिवार, दि. २२ आॅगस्ट रोजी सायं. ७-५७ पर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे याच दिवशी गणेशस्थापना करावयाची आहे. गणेशस्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. शनिवार, दि. २२ आॅगस्ट रोजी सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५६ पर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्ती स्थापना करावी असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देतांना सोमण म्हणाले की ज्यांना या वेळेत गणेशस्थापना करता येणार नाही त्यांनी त्यादिवशी पहाटे पाच पासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेशस्थापना केली तरी चालेल.
यावर्षी कोरोनाची साथ आहे. सर्वांनी गणेशोत्सव साधेपणाने पण मोठ्या उत्साहाचे साजरा करावा. कोरोना प्रतिबंधक उपाय व शिस्त यांचे कसोशीने पालन करावे. गणेशमूर्ती आकाराने लहान आणि मातीची असावी. स्वत: माती आणून जमेलतशी गणेशमूर्ती तयार केली तरी चालेल. गणेशपूजनासाठी जेवढे साहित्य उपलब्ध होईल तेवढे वापरावे. जे नसेल त्याजागी अक्षता अर्पण कराव्या. गणेशपूजेसाठी पुरोहित नसतील तर पुस्तकावरून किंवा आॅनलाईन ॲप वापरून पूजा करावी. कोरोना संकटामुळे गणेशदर्शनासाठी यावर्षी शक्यतो आप्तेष्ट-मित्राना बोलवू नये. त्याऐवजी त्यांना आॅनलाईन ॲपवरून पूजेमध्ये, आरतीच्यावेळी, अथर्वशीर्ष म्हणताना सामील करून घ्यावे.
गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच स्वच्छ पाण्याने भरलेल्या बादलीत करावे. कृत्रिम तलावाचा वापर करावा. गर्दी करू नये. 
यावर्षी मंगळवार २५ आॅगस्ट रोजी दुपारी १-५८ नंतर गौरी आणावयाच्या आहेत. बुधवार २६ आॅगस्ट रोजी गौरीपूजन आहे. गुरुवार २७ आॅगस्ट रोजी दुपारी १२-३६ नंतर गौरी विसर्जन करायचे आहे. यावर्षी मंगळवार
१ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. 

पुढच्यावर्षी गणपतीबाप्पाचे आगमन उशीरा म्हणजे शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ रोजी होणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133