पनवेल दि.21: शेतकरी आणि कामगार यांच्या नावाने राजकारण करत स्वतःची पोळी भाजणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या शेकापला कार्यकर्त्यांसह जनता पुरती कंटाळलेली आहे. समाजकार्यापासून दूर गेलेल्या शेकापने प्रत्येकवेळी राजकारण केले. शेकापच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज (दि.२१) पनवेल महानगरपालिकेतील शेकापचे नगरसेवक हरेश केणी यांचे बंधू आणि शेकापच्या नगरसेविका शीतल केणी यांचे पती दिनेश केणी, नगरसेवक बबन मुकादम यांच्या पत्नी, महिला जिल्हाध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती प्रिया मुकादम, नगरसेविका जयश्री म्हात्रे यांचे पती रविकांत म्हात्रे, शेकापचे चिटणीस कैलास घरत, पुरोगामी संघटना अध्यक्ष महेश साळुंखे, व्यापारी संघटना अध्यक्ष गणेश घरत यांनी त्याच्या हजारो समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकापक्षाला मोठे भगदाड पडले आहे. 

हा पक्षप्रवेश सोहळा पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात विकासाची लाट आली आहे, त्यांची कार्यप्रणाली सर्वसामान्य जनतेच्या हिताची आणि सर्व समाजाच्या प्रगतीची आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश झाला.

एकेकाळी दिमाखात वावरणाऱ्या शेकापला दिवसेंदिवस घरघर वाढली आहे. शेकाप नेत्यांचे स्वार्थी राजकारण आता जनतेला कळून चुकले आहे. काम असेल तेव्हा कार्यकर्त्याला गोंजारायचे आणि काम झाल्यावर ढुंकूनही त्यांच्याकडे पहायचे नाही हा शेकापचा फंडा सर्वश्रुत आहे. शेकापची मतलबी वृत्ती जगजाहीर आहे. त्यामुळे शेकापतील अनेक मातब्बर कार्यकर्त्यांनी शेकापपासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्या अनुषंगाने आज शेकापच्या या डॅशिंग नेत्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश करत शेकापच्या ढोंगी पुढाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. 


भाजप सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष- लोकनेते रामशेठ ठाकूर 

भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारा पक्ष आहे. तळागाळातील घटकाचाही विकास झाला पाहिजे, हा मूलमंत्र जपणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणारा हा पक्ष आहे. तुम्ही देशाचा विकास आणि विचार करणाऱ्या पक्षात दाखल झाले आहेत. तुमच्यात काम करण्याची धमक आहे. त्यामुळे तुम्ही योग्य पर्याय निवडला असून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी एकसंघ काम करीत राहू या. नगरसेवक हरेश केणी यांचा स्वभाव नॅच्युरल आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीत त्यांना मते मिळाली त्यांच्या जागी शेकापचा उमेदवार असता तर त्याला एवढी मते मिळाली नसती.


भाजप नुसता पक्ष नाही तर मोठे कुटुंब – माजी मंत्री रविंद्र चव्हाण  

भाजप नुसता पक्ष नाही तर मोठे कुटुंब आहे. रायगड जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख लोकनेते रामशेठ ठाकूर सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे रायगडच्या कुटूंबात सर्वजण सुरक्षित आहेत. प्रथम राष्ट्र नंतर पक्ष त्यानंतर स्वतः हा भाजपचा मूलमंत्र आहे. येणारा काळ शांत प्रतिशत भाजप आहे. सर्व विषयाला न्याय देण्याचे काम केंद्र सरकार आणि येणारे राज्य सरकार करीत राहील. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व देशाला अभिमान – आमदार प्रशांत ठाकूर  

देशाचे नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व देशाला अभिमान आहे. प्रथम संसदेत गेल्यावर या लोकशाहीच्या मंदिराला नमन करून त्यांनी लोकशाहीचे महत्व जगाला पटवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्याचे काम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तृत्वाने खरे करणारा नेता त्या पक्षात काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोरगरीब नागरिक उपाशी राहू नये यासाठी उपक्रम राबविला. पनवेलमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ८० हजारहून अधिक लोकांना कोरडा अन्नधान्य, मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक भोजन, मास्क, सॅनाटयझर, व इतर आवशयक साहित्य दिले, उरणचे आमदार महेश बालदी आणि पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनीही त्यांच्या मतदार संघात नागरिकांना भरभरून मदत केली. कोरोना व लॉकडाऊन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे काम केले याचा अभिमान आहे. त्यामुळे एक कुटूंब म्हणून आपण सर्वजण काम करीत राहू या. आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा बँकेचा लढा आपण लढत आहोत. या संदर्भात महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार कुचकामी ठरले. विवेक पाटील यांनी ठेवीदारांचे लपून ठेवलेले पैसे बाहेर काढू. 


विवेक पाटीलांनी समाजाला लुटले – आमदार महेश बालदी 

समाजाचे ५१२ कोटी रुपये खाऊन भाड्याच्या आस्वाद बंगल्यात राहणाऱ्या शेकापनेते विवेक पाटील यांना धुडकावून प्रवेश केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन. शेकापचा तो एक काळ होता पण आता या पक्षाच्या भ्रष्ट नेत्यांमुळे पक्षाची अब्रू वेशीला टांगली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि विमानतळ, रेल्वे अशी अनेक महत्वकांक्षी प्रकल्प उभारणीचे काम ठप्प झाले. हे सरकार विकासाच्या ऐवजी भकासावर भर देत आहे. त्यामुळे हि महाविकास आघाडी पाकिटमाऱ्यांची गॅंग झाली आहे. आपल्या नादी लागतात त्यांना राजकारणातून उठविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. 


कोरोनोपेक्षा कर्नाळा बँक घोटाळा भयंकर -अरुणशेठ भगत 

कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती विवेक पाटील यांनी कर्नाळा बँकेचा घोटाळा करून आणली. सर्वसामान्य ठेवीदारांना उपाशी मारण्याचे काम या घोटाळ्याने केले. विवेक पाटील यांनी महापापाचे काम केले. सर्वांचा विश्वासघात केला. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!