पनवेल दि.9: महापालिका हद्दीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा रुग्णांना खाजगी रुग्णालयात मिळण्यास अडचण असल्याने त्याबाबत शासनाने निकष बदलण्याची गरज असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काल महापालिका आयुक्तांबरोबरच्या बैठकीत बोलताना केली.
या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूऱ, आमदार बाळाराम पाटील, महापौर डॉक्टर कविता चौतमोल , उप महापौर जगदीश गायकवाड , सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक संजय भोपी उपस्थित होते.
पनवेल महापालिका हद्दीत कोव्हिड-19 च्या रुग्णांसाठी महापालिकेने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा रुग्णांना मिळत नसल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयक्त सुधाकर देशमुख यांचे लक्ष वेधले असता या योजनेचा फायदा रुग्णांना मिळण्यासाठी त्या रुग्णालयात 50 बेडची आवश्यकत्ता असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पनवेल महापालिकेणे कोव्हिड-19 च्या रुग्णांसाठी महापालिकेने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांपैकी फक्त एकाच रुग्णालयात 50 बेड आहेत आणि इतर रुग्णालयात 20 किवा कमी बेड असल्याने रुग्णांना या योजनेचा फायदा मिळत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे निकष ठरवले. त्यावेळी कोव्हिड -19 अस्तीत्वात नसल्याने आता या निकषात बदल करण्याची गरज आहे त्यासाठी शासनाकडे आपण पत्र देऊच पण सत्ताधारी आमदार बाळाराम पाटील यांनी ही याबाबत आग्रह धरावा असे ही त्यांनी सुचवले. यावेळी ऑक्सीजन बेड उपलब्ध करण्या बाबत ही चर्चा झाली. महापालिकेने आठवड्यात 40 बेड उपलब्ध होतील अशी माहिती दिली. यावेळी कोव्हिड -19 साठी लागणारी इंजेक्शन रुग्णांना काळया बाजारात जास्त किमत देऊन खरेदी करावी लागत आहेत यासाठी 1 हजार इंजेक्शन खरेदी करावी असे ही सांगण्यात आले.