पनवेल दि.१३: प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमिताने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्यावतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय ‘महारोजगार मेळावा’ आज पनवेल शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या महारोजगार मेळाव्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे.
या मेळाव्यास प्रमुख मान्यवर म्हणून संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, नवी मुंबई अध्यक्ष दीपक पाटील, उपायुक्त पवार, उपायुक्त गावडे, विनोद म्हात्रे, राजेंद्र पाटील, जे.डी तांडेल, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, कृष्णकुमार भारती, गुलाब वझे, जयेश घरत, मधुकर भोईर यांच्यासह विविध कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या मेळाव्यात नामांकीत उद्योग आणि कंपनीमध्ये नोकरीची संधी तसेच कौशल्य विभागाच्या माध्यामतून प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप रजिगारासाठी नोंदणी तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध कंपनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधत जास्तीत जास्त युवक युवतींना रोजगार देण्याचे आवाहन केले. या मेळाव्यास ठाणे, रायगड आणि नवी मुंबईतील रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या युवक-युवतींनी लाभ घेतला. या मेळाव्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!