पनवेल दि.13: सिडको व्यवस्थापनाने प्रकाल्पग्रस्तांच्या जमिनी संपादीत करून ५० ते ६० वर्ष आस्तित्वात असलेल्या 
प्रकल्पग्रस्त युवकांच्या मैदानावर रहिवाशी घरांसाठी इमारती उभारून सर्व गावांची पारंपारीक मैदाने गिळंकृत केली तर काही NMSEZ यांच्या घशात घातली. त्यामुळे युवकांना खेळण्यासाठी मैदानेच शिल्लक नाहीत. सिडको नियोजन विभागाने शाळांसाठी आरक्षित भुखंडासमोर मैदानांचे आरक्षण करून कॉमन प्ले ग्रांउडची रचना नोडल मध्ये केली. परंतु, शैक्षणीक संस्थानी वॉल कंपाऊंड घालून ही मैदाने संस्थेच्या मालकीसाठी ताब्यात घेतली, सिडकोचे हे धोरण चुकलेले आहे. सिडको विमानतळ, न्हावा शिवडी मार्ग, नेरूळ – उरण रेल्वे, आर. आर. पॅकेज यासाठी भूसंपादन करताना सिडको व्यवस्थापनास सोबत चातुर्याने वाटाघाटी करून सगळ्या प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबई विमानतळा प्रमाणे साडेबावीस टक्केचे पॅकेज मिळवून देत कामगार नेते महेंद्र घरत यांनी शेलघर,कोपर, गव्हाण या गावांना नवीन खेळांची मैदाने तयार करून घेतली तर बामणडोंगरी,
मोरावे, जावळे, धुतुम, पागोटे, कोटनाका,
बोकडविरा,गावांसाठी आश्वासन दिल्या प्रमाणे NMSEZ मधील मैदाने आरक्षित करावी म्हणून सिडको नियोजन, भूसंपादन, इंजिनियरिंग, सर्व्हे विभागाच्या अधिकाऱ्यां सोबत वरील गावांचा संयुक्तिक पाहणी दौरा करून ही मैदाने सोडावित म्हणून सिडको व्यवस्थापनाला सांगितले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!