अलिबाग, दि.1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली असून या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती,  जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर,  तहसिलदार सचिन शेजाळ, तहसिलदार सतिश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मोजकेच कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या रायगडवासियांना शुभेच्छा दिल्या व करोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग चे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम प्रथमच अत्यंत साधेपणाने पण उत्साहात संपन्न झाला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!