पनवेल दि.३०: जिल्ह्यात आज एकूण कोविड बाधित रुग्ण संख्येत -६ ने वाढ झाली असून पनवेल मनपा -५ तर
उरण-१ अशी आकडेवारी आहे
आजचे नविन रूग्ण :
१) आज खारघर सेक्टर-४ येथील ३३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांचे पती याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. सदर महिलेला त्यांच्या पतीपासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
२) नविन पनवेल सेक्टर-९ मधील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीला मेडिकल शॉपमधून औषधे आणताना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. संबंधित मेडिकल शॉपमधील सर्व कामगारांच्या तपासण्या सुरू आहेत.
३) कामोठे सेक्टर-११ येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
४) कामोठे सेक्टर-२१ येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती गोवंडी, मुंबई येथील फार्मा कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्ती कामोठे ते गोवंडी असा बस प्रवास करीत असल्याने त्यांना प्रवासादरम्यान संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
५) कामोठे सेक्टर-२१ येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती टाटा कॅन्सर हॉस्पीटल, मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
६) उरण मोरा येथील ३७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून सदर व्यक्तीस उरण मुंबई प्रवासा दरम्यान कोरोनाची लागण झाल्याच प्राथमिक निष्कर्ष आहे.
