पनवेल दि.17: (हरेश साठे) गोर गरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे, असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा ७० वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून पण त्यांच्या कार्याला साजेसा असा भव्य स्वरूपात आणि संस्मरणीय वाढदिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
०२ जून २०२१ रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० वा वाढदिवस आहे. यानिमीत्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची पहिली बैठक पार पडली. 
माणूस केवळ दौलतीने मेाठा होत नाही तर तो दानतीने आणि माणुसकीने मोठा होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. महापूर असो किंवा कोरोना वैश्विक महामारी किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे करून कायम सामाजिक बांधिलकी जपली आहे आणि आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन घडविले आहे. सर्व समाजात त्यांची प्रेरणा घेऊन अनेकांनी समाजसेवा अंगिकारली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दानशूरतेची व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कार्याची महती मोठी आणि देशभर पसरली आहे. त्यांचा यंदा असलेला ७० वा वाढदिवस विशेष आहे. त्यामुळे कार्यकर्ते व लोकाग्रहास्तवर वाढदिवस भव्य स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘उत्तुंग व्यक्तीमत्वाचा, उत्तुंग वाढदिवस’ साजरा व्हावा, यासाठी यंदा किमान सात दिवस तरी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रमे घेण्याचे यावेळी निश्चित झाले.
यावेळी नियोजनासंदर्भात झालेल्या चर्चेत भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक नितीन पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, डॉ. एस. टी. गडदे, ब्रिजेश पटेल, मयुरेश नेतकर आदींनी विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सूचना मांडल्या. त्या अनुषंगाने या सुचनांची नोंद करून येत्या पंधरा दिवसांत कार्यक्रमांची रूपरेषा अंतिम करण्यात येणार आहे. 
यावेळी व्यासपीठावर स्थायी समिती सभापती संतोष पाटील, नगरसेवक अनिल भगत, अमर पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत ब-हाटे, वसंत पाटील उपस्थित होते. या बैठकीस आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!