“कोमसाप नवीन पनवेलचे ऑनलाइन कवी संमेलन”

पनवेल दि.10: कोकणातलं मराठी साहित्य अनेक अंगांनी समृद्ध झाले आहे, प्रतिभेच्या साहित्य क्षेत्रातील कोकणातील अनेक मान्यवरांनी महाराष्ट्राला दिशा देईल असे साहित्य निर्माण केले आहे असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाइन कवी संमेलनाच्या(पुष्प तिसरे) उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या कविसंमेलनाला सुप्रसिद्ध अभिनेत्री नयन पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
यापुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, कोकणच्या मातीने महाराष्ट्राला राजकीय क्षेत्रात प्रतिभावंत आणि देशाचे नेतृत्व करणारे नेते दिले आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये वेगळ्या बंधनामध्ये सगळे जण बांधले गेलो आहेत.सामाजिक दृष्ट्या एकत्र येणे शक्य नसल्याने तंत्रज्ञानाच्या अंगाने ऑनलाइन कवी संमेलन ही एक कवींना संधी आहे .या कविसंमेलनात साहित्यातले वेगळे प्रकार तसेच वेगवेगळे विषय कवितांमधून सादर केले जातील,अशा अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सुप्रसिद्ध अभिनेत्री नयन पवार यांनी,कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या काळातील ऑनलाईन कवी संमेलनाची संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे .हा उपक्रम नवोदित साहित्यिकांना एक संधी आहे .हे कवी संमेलन केवळ लॉकडाऊन पुरते न ठेवता यापुढे सातत्याने ठेवावे अशा सूचना केल्या. 
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारे एक सशक्त माध्यम म्हणजे कविसंमेलन.नवीन पनवेल शाखेच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ऑनलाइन कविसंमेलनाला वाढता प्रतिसाद पाहता दिवसेंदिवस हे कवी संमेलन बहरत चालले आहे असे सांगितले.
या कविसंमेलनात कवी रोहिदास पोटे यांनी आले कळून धोके ही गझल सादर केली तर कवी गणेश म्हात्रे यांनी करू कोणावर मात, कवी विजय पवार यांनी आयुष्य वाचताना,कवी मिलिंद पाटील यांनी कर्तव्याची दोरी कविता सादर केली. आपल्या सुरेल आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी वैदू यांनी केले तर आभार मनोज म्हात्रे यांनी मानले.या ऑनलाइन कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या कवींना प्रमाणपत्र देण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!