कळंबोली दि.१२ : नवी मुंबई सह पनवेल मध्ये वास्तव्य करणाऱ्या उत्तराखंड वासियांनी गेल्या सोळा वर्षापासून कौथिंग नावाने भरवल्या जाणाऱ्या कला आणि संस्कृतीच्या उत्सवाने उत्तराखंड समाजमन आणि संस्कृती साकारली गेली. कला संस्कृती तसेच खाद्य संस्कृतीच्या देवाण-घेवाणीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्तराखंडचे संस्कृतीचे प्रदर्शन या निमित्ताने नवी मुंबईकरांना घडले.
पनवेल तसेच नवी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने उत्तराखंड मधील वासिय आपल्या व्यवसायात नोकरी धंद्यानिमित्त वास्तव्य करून आहेत. गेल्या सोळा वर्षापासून नवी मुंबईमध्ये कौथिंग नावाने येथे पारंपरिक पद्धतीचे एक प्रकारे उत्तराखंडवासियांचे स्नेहसंमेलन भरवले जाते. यामध्ये उत्तराखंड मधील विविध पारंपरिक संस्कृतीचे प्रदर्शन या दहा दिवसाच्या बहारदार कार्यक्रमात नवी मुंबईकरांना दाखवले जाते .जरी उत्तराखंड वासियांचा कार्यक्रम असला तरी महाराष्ट्राची पारंपारिक नृत्य ,पोवाडे ,आगरी कोळी नृत्य, अभंग, किर्तन यांचाही समावेश या उत्तराखंड वासीय संस्कृतीमध्ये केला गेला .त्यामुळे या कार्यक्रमाला एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले. आम्ही उत्तराखंडवासीय असलो तरी महाराष्ट्रीय संस्कृती बरोबर आमचा घरोबा झाला असल्याने आम्ही समरस होऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकरूप झालो असल्याची भावना यावेळी दिलीप भिस्त यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला उत्तराखंडातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमांमध्ये अधिक जान आणली. उत्तराखंड राज्याचे वन मंत्री सुबोध युनियाल, माजी मंत्री हरक सिंग रावत आणि भाजपा चे वरिष्ठ आमदार मुन्ना सिंग चौहान यांनी पण हजेरी लावली. महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते मंत्री गण या कार्यक्रमास उपस्थित राहून आम्हीही उत्तराखंडवासीयांच्या बरोबरीने असल्याचे सांगण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन उत्तराखंडवास यांनी दाखवलेल्या विविध संस्कृती कला कार्यक्रमाचे मनापासून स्वागत केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तरखंडमधील कलाकारांनी ज्या पद्धतीने कलेचे प्रदर्शन केले त्याने पनवेलचे आमदार कोणते फार होऊन गेले असून या पुढील दरवर्षी होणाऱ्या या उत्तराखंड बंधू भगिनींच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे निर्धार यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे सदरचा भव्य दिवस सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौथीग कार्यक्रम संयोजक केशर सिंग बिष्ट, कुसुम लता गुसाई,रंजीत बिष्ट, रूपलाल, दिलीप बिष्ट, धीरज गोसाई, रजनी युनियाल, ज्योती पोखरिया, ज्ञान सिंग बिष्ट, मनोज भरद्वाज, शशी नेगी आदी संस्था चे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.