पनवेल दि.१२: फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पावलावर पाउल ठेवून रुग्णसेवेचा वसा आज नर्सेस कडुन उचलला जात आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून हे कार्य असेच सुरु राहील असा सुर मान्यवरांनी व्यक्त केला. आद्यपरिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिन सर्वत्र नर्सेस दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने सोमवारी पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम झाले. मान्यवरांच्या हस्ते प्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नेहा चव्हाण, स्वाती शिंदे यांनी नर्सेस दिनाचे महत्व आणि प्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. नर्सेस दिनाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयातील नर्सेस साठी दिवसभर विविध कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. शिवाजी पाटील, डॉ. प्रसाद जठार, डॉ. प्रतिक म्हात्रे, डॉ. स्वाती नाईक, डॉ. सायली बेलगे, सहायक अधिसेविका ज्योती गुरव यांच्यासह कर्मचारी वर्ग, स्टाफ नर्सेस उपस्थित होते.

🛑पनवेल फुटबॉल लीग २०२५ चे आयोजन !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!