पनवेल दि.१६: पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे मॉर्निंग वॉकमधून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, अमित ओझे, केदार भगत, विनायक मुंबईकर, स्वप्निल ठाकूर आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांना नवमतदार, युवा, महिला वर्गाचा पाठिंबा तर ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे आणि सामाजिक बांधिलकीतून केलेले समाजकार्य नेहमीच लोकहिताच्या दृष्टिकोनातून प्रेरणादायी ठरले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत करून त्यांना समर्थन दिल जात आहे.