अबोली रिक्षा महिला संघटना, जय गोपीनाथ प्रतिष्ठान आणिबालाजी सिम्फनी मधील सर्व दहा हौसिंग सोसायटींचा भाजपाला पाठींबा
पनवेल दि.१७: अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्यच्यावतीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच जय गोपीनाथ प्रतिष्ठानने सुद्धा बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावता यावा या हेतूने ही संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी स्थापन केली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पहिला अबोली रिक्षा महिलेचा रिक्षा थांबा नवीन पनवेल येथील डि मार्ट येथे सुरु करण्यात आला. भारतीय जनता पक्ष हा देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच प्रशांत ठाकूर यांना या संघटनेचे पदाधिकारी व महिला सदस्यांनी एकमताने जाहीर पाठिंबा देण्याचे ठरल्यानंतर त्या संदर्भातील पत्र लोकनेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी आज सुपूर्द केले. यावेळी प्रिंट पॉइंटचे संचालक संतोष सुतार उपस्थित होते.
पनवेल परिसरातील सर्व वंजारी समाज बांधव व जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुद्धा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे, मार्गदर्शक बबन बारगजे, सचिव हनुमंत विघ्ने, विठ्ठल घोळवे, मोहन केदार, प्रदेश उपाध्यक्ष विनोद खेडकर, रायगड जिल्हाध्यक्ष तुकाराम केदार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अंकुश खरमाटे, स्वप्नील राख, लक्ष्मण जायभाये, दिलीप गर्जे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील आकुर्ली-सुकापूर येथे असलेल्या बालाजी सिम्फनी मधील सर्व दहा हौसिंग सोसायटींनी भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना आपला बिनशर्त पाठींबा आज जाहीर केला आहे.
यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर, सोसायटीचे पदाधिकारी व प्रतिनिधी, भाजपचे तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, तालुका चिटणीस यतिन पाटील, आकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा नेते राजेश पाटील, दीवेश भगत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.