पनवेल दि.१६ : पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग, आचारसंहिता पथकांतर्गत दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:५० वाजण्याचे दरम्यान कल्याण शिळफटा ते कळंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या धानसर टोल नाका येथे रोडवरून जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची क्रेटा कंपनीची चार चाकी गाडीस थांबवून तपासणी केली असता, त्या गाडीत असलेल्या ब्राउन कलरच्या लेदर बंग मध्ये एक लाख सव्वीस हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम आढळून आली. स्थिर सर्वेक्षण पथक क्र. ०१ मार्फत सदरील रोख रक्कम जप्त करण्यात आली.
सदर कारवाई १८८ पनवेले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.