कळंबोली दि.१६: लोकशाही उत्सवात मतदान आणि मतदार यांचे अन्यन साधारण महत्व आहे. मतदानानेच लोकशाही प्रबळ अन सशक्त होऊ शकते. निवडणुकीच्या कर्तव्यावर ही असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले आहे. आम्हीही आमचा मतदानाचा हक्क बजावला नागरिकांनीही आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन सुधाकर जैवळ या निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला आहे.
लोकशाहीचा मतदार हाच श्वास आहे. एक मत हा चांगला उमेदवार निवडून आणू शकतो आणि एक मत नाही दिलं तर चुकीचा उमेदवार ही निवडून येऊ शकतो. एका मताची किमया ही या देशाने अनेक वेळा अनुभवली आहे. अनेक लोकप्रतिनिधींना एका मताने पराभव होण्याचा दणकाही मिळालेला आहे. त्यामुळे लोकशाही च्या उत्सवामध्ये १००% मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी जाहिरात, पथनाट्य, विविध संकल्पना, पोस्टर पत्रके, यांचा भडीमार करून मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त केले जात आहे. वृद्ध मतदारांकरता गृह मतदानाची संकल्पना ही शासनाने रुजवली आहे आणि त्या मतदानाला ही सुरुवात झाली आहे. त्यालाही प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यामुळे जनजागृती होऊन मतदारही आता मतदान करण्यासाठी सज्ज झाला आहे. निवडणुकीच्या कामावर अन कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी ही प्रशिक्षण दरम्यान आपला मतदानाचा हक्क टपाली मतदानाने बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही मतदान केले तुम्हीही मतदान करा लोकशाही सशक्त करा असे आवाहन या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.