पनवेल दि.१२: पनवेल तालुक्यातील कोपर येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधून तयार झाली असून या इमारतीचे लोकार्पण आज माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी इमारत चांगली असली की, शिक्षण घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला उद्योजक जे. एम. म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जि. प. सदस्य रवींद्र पाटील, पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, सचिन घरत, सुनिता घरत, कामिनी कोळी, उषा देशमुख, रघुनाथशेठ घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अनंता ठाकूर, वामनशेठ म्हात्रे, पंढरीनाथ घरत, बाबुराव कांबळे, साई मोकल, किशोर घरत, कमलाकर घरत, साई मोकल, हनुमान घरत, रघुनाथ देशमुख, किशोर घरत, आनंदी घरत, नंदा भोईर, इंदूताई म्हात्रे, सुनीता घरत, उलवे नोड उपाध्यक्ष सुजाता पाटील, सी. एल. ठाकूर, सिडकोचे अधिकारी भितले, भावरे, केंद्र प्रमुख एस. एम. जोशी, सुधीर ठाकूर, ग्रामविकास अधिकारी राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जि. प.ची कोपर येथील शाळेची नवीन इमारत सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे. या शाळेसाठी व मैदानासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत आणि महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष अनुसया घरत यांनी जागा दिली असून त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात आला तसेच या शाळेसाठी माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर घरत यांनी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली असून मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचबरोबर गव्हाण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी आठ टेबल, दोन ऑफिस खुर्च्या, दोन कपाटे, आठ छोट्या खुर्च्या, तर विजय घरत यांच्या माध्यामतून शाळेतील सात वर्ग खोल्यांसाठी सात घड्याळे आणि मध्यवर्ती ठिकाणी एक मोठे घड्याळ देण्यात आले आहे. त्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!