रत्नागिरी दि.२७ (सुनिल नलावडे) गौरी गणपतीचे विर्सजन करोना नियमाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने पारंपारीकरित्या पार पडले. खाडीपट्टयात किनाऱ्यावर वाडीवाडीतील गणेशभक्तांनी गौरी गणरायाची मुर्ती विसर्जनासाठी आणल्या स्वतंत्रपणे गणरायांच्या मुर्त्यांचे आगमन झाल्यावर पाठोपाठ गौरीना घेऊन महीला सुरक्षित अंतर ठेऊन पुढे गणपती व पाठीमागे गौरी घेऊन ग्रामीण भागातील या महिला उभ्या राहील्या या वेळी गणपतीची विर्सजन आरती घरातच करून गणपती विसर्जनाला आणण्यात आले.
संगमेश्वरमधील करजुवे, भात गाव, तिसंग आदी गावातील गणपती विसर्जन होडीतुन करण्यात आलेले विसर्जन संध्याकाळी उशीरापर्यत टप्याटप्याने करण्यात आले.
यावर्षी गणपतीसाठी मुंबईकर चाकरमानी गावातील भावकीने आखलेल्या नियमावलीचे पालन करून घरचा गणपती उत्सव उत्साहात पार पाडला.
गावामध्ये अनेक चाकरमान्यांनी गणपतीला येण्याचे टाळून घरात असणाऱ्या मंडळी कडूनच गणपती उत्सव साजरा केला मात्र काही बंद घरातील चाकरमानी दहा दिवस आधी येऊन आरोग्य तपासणी केल्यावर घरी येऊन आपल्या घरात गणपती आणले होते. गावकऱ्यांनी आपल्या गावातील या चाकरमान्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्यामुळे गावोगावचा गणेशोत्सव दिमाखदारपणे पार पडला.
या वर्षी गणपतीचे आगमन व विसर्जन वेळी ढोल ताशा गुलालाची उधळण झाली नसली तरी गावागावामध्ये अमाप उत्साह होता यावेळी केवळ गौरीचे झालेले आगमन व त्यावेळी पाणवठयावरुन येणारी गौराई हे आर्कषीत करणारे दृष्य होते. उभ्या शेतातुन धबधब्याच्या जवळून व डोंगर दऱ्यातील वाटांवरून झालेले गौरीचे आगमन समस्त गणेशभक्तांचे आकर्षण ठरले होते. गावातील ग्रामपंचायतीनी व स्थानिक प्रमुख मंडळीनी आपापल्या वाडी वस्ती वर सलोखा राखत गणेशोत्सव पार पाडला.
यावर्षी करोनाच्या पार्श्वभुमीवर शिस्तबघ्द आयोजन करण्याचे काम करजुवेचे ग्रामस्थ सुभाष नलावडे,सरपंच श्याम माने,सुरज माने,संतोष व प्रमोद नलावडे, दत्ताराम नलावडे,नंदकुमार नलावडे, चंद्रकांत नलावडे, प्रदिप जाधव.अविनाश नलावडे,चंदू व सतीश नलावडे यानी केले.