२० जानेवारीपूर्वी सिडको एमडी सोबत बैठक घेण्याचे पोलिसांचे कृती समितीला आश्वासन
१३ जानेवारी रोजी होणारी भूमिपुत्र परिषद वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय
सिडको व्यवस्थापकीय सचांलकाबरोबर बैठकीत भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी न लागल्यास २४ जानेवारी रोजी काम बंद आंदोलन

पनवेल दि.११: १३ जानेवारी रोजी होणारी भूमिपुत्र परिषद वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय कृती समितीद्वारे जाहीर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना समिती तर्फे सांगण्यात आले की, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आणि पोलीस प्रशासन यांची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादमाने, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, जे. डी. तांडेल, गुलाब वझे, संतोष केणे, रुपेश धुमाळ, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. विमानतळ बाधित २७ गावांवर होणाऱ्या सिडकोच्या अन्यायाबाबत कृती समितीने चर्चा केली. या बैठकीत कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे आंदोलन करू नये अशा सूचना व आवाहन पोलिस प्रशासनाने कृती समितीला केले. यावेळी पोलिसांनी या प्रश्नासंबंधी सिडको व्यवस्थापकीय सचांलकाबरोबर २० जानेवारी पूर्वी बैठक घेण्याचे आश्वासित केले. यावेळी कृती समितीने सिडको व्यवस्थापकीय सचांलकाबरोबर भूमिपुत्रांच्याबाबतीत प्रश्न मार्गी न लागल्यास २४ जानेवारी रोजी काम बंद आंदोलन करणार असल्याचे पोलीस प्रशासनाला सांगितले आहे.
मात्र १३ जानेवारीला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी कोल्ही कोपर येथे होणारी भूमिपुत्रांची निर्धार परिषद कोविड चा प्रोटोकॉल पाळून मर्यादित स्वरूपात करण्याची कृती समितीने जाहीर केले. या परिषदेला पनवेल उरण विभागातील प्रमुख कार्यकर्ते व विमानतळ बाधित २७ गावचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे कृती समितीतर्फे कार्याध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले. करोनाच्या मोठ्या स्वरूपाच्या लाटेमुळे परिषदेचे स्वरूप बदलण्यात आले असले तरी १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळेला दिबांची जयंती आपापल्या गावागावांमध्ये,विभागामध्ये साजरी होईल.त्यानंतर प्रमुख कार्यकर्ते कोल्ही कोपर येथे येतील असे ठरले आहे. तसेच सिडको व्यवस्थापकीय सचांलकाबरोबर होणाऱ्या बैठकीत भूमिपुत्रांच्याबाबतीत प्रश्न मार्गी न लागल्यास २४ जानेवारी रोजी काम बंद आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133