पनवेल दि.१७: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भाजीविक्रेत्यांसाठी येत्या १९ सप्टेंबर रोजी “महाआरोग्य शिबिराच” आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात भाजी विक्रेत्यांना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड (ABDM) , पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAP) अंतर्गत नोंदणी आणि आयुष्यमान वयोवंदना कार्डच वाटप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नेत्र तपासणी, बालरोग, स्त्रीरोग, सर्जन, अस्थिरोग, फिजिशियन, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडचिकित्सा, दंतचिकित्सा या सर्व तपासण्यांबरोबर सर्व प्रकारचे औषध आणि रक्ताच्या चाचण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, आमदार विक्रांत पाटील, भाजपा नेते प्रीतम जनार्धन म्हात्रे, मा. नगरसेविका दर्शना भोईर, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण, अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर तसेच रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल जुने भाजी मार्केट, पंचमुखी मारुती सर्कल या ठिकाणी सकाळी ठीक ११.०० वा. करण्याचे योजिले आहे. या महाआरोग्य शिबिराचा सर्व भाजी विक्रेत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

🛑माझी कैलास मानसरोवर यात्रा ०.२ – महेंद्र घरत🔹’कैलास मानसरोवर यात्रा’ प्रवासातील स्मरणीय अनुभव कथन

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!