पनवेल दि.१५ : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सन 2009-10 पासून डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पोलिसांसाठी आरोग्य शिबीर घेत आहे. यावर्षी ही रविवार दिनांक 14/07/2024 रोजी पनवेल तालुका पोलीस ठाणेे या ठिकाणी मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, पनवेल व मा.सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांचे माध्यमातून परिमंडळ 2 अंतर्गत सर्व पोलीस व त्याचे कुटुंबियांसाठी शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल, डॉ.डी.वाय हॉस्पिटल ब्लड बॅंक, नेरूळ नवी मुंबई तसेच , पनवेल मधील प्रतिष्ठित डॉक्टर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांचे आरोग्य उत्तम राहिले तर ते गुन्हेगारीमुक्त समाज घडवू शकतात.
आयोजित आरोग्य शिबिरामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबिय असे एकूण 163 जणांची पूर्ण आरोग्य तपासणी (मधुमेह, रक्तदाब, हाडांची घनता, इ सी जि, फुफुसांची तपासणी, डोळे तपासणी, दात तपासणी, रक्त तपासणी तसेच रक्तदान शिबीर) करून मोफत औषधे वाटप करण्यात आले.
तसेच रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश पोटे व प्रथम क्लब नारी वैशाली पोटे, खजिनदार ऋषी बुवा व रमा बुवा या उभायंतासह पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांचे सह एकूण 18 जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उदघाट्न पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केले. या प्रसंगी पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील साहेब , पोलीस निरीक्षक भगत व पोलीस निरीक्षक शेलकर उपस्थित होते.
आयोजित आरोग्य शिबिरामध्ये सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य विषयक तपासणी करून मार्गदर्शन करणे करिता रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांचे वतीने पनवेल, नवी मुंबई विभागातून एकूण 33 प्रतिष्ठित डॉक्टर उपस्थित होते.
सदर शिबीर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे माजी अध्यक्ष व सध्याचे मेडिकल संचालक डॉ. लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव दीपक गडगे यांचेसह सर्व रोटरी सदस्य,एन्स,अनेट्स यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!