पनवेल दि.१७: शहरात वैद्यकीय सुविधांच्या दृष्टिकोनातून नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ. केसी डॉयग्नॉस्टीक सेंटरचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी ‘तुमचे आरोग्य हे आमचे प्राधान्य’ हे उद्दीष्ट समोर ठेऊन पनवेल शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील साई आर्केड येथे कार्यान्वित केला आहे. या सेंटरच्या माध्यमातून २डी/४डी सोनोग्राफी, पॅथॉलॉजी, एक्स- रे, २डी इको, टीएमटी, इइजी, ईसीजी, सिटी स्कॅन, कलर डोपलर, ३डी फॉलिक्युलर स्टडी, मॅमोग्राफी आदी उत्तम दर्जाच्या सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महापौर पदाला शोभेल असे डॉयग्नॉस्टीक सेंटर डॉक्टर कविता चौतमोल यांनी पनवेलमध्ये सुरु केले आहे अशा शब्दात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कविता चौतमोल यांचे अभिनंदन करुन डायग्नॉस्टिक्स सेंटरच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी डायग्नॉस्टीक सेंटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीच्या सुविधा कमीत कमी दरामध्ये आणि अतिशय विश्वासार्ह ट्रीटमेंट मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रमुख पाहुणे आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. गिरीश गुणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, संतोष शेट्टी, राजू सोनी, तेजस कांडपिळे, समीर ठाकूर, मुकीद काझी, गणेश कडू, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, किशोर चौतमोल, कामगार नेते जितेंद्र घरत, अशोक मुंडे, सीमीरा डायग्नॉस्टीकचे डायरेक्टर डॉ. संतोष वाघचौरे, डॉ. जय किनी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रभाग क्रमांक १९ चे अध्यक्ष पवन सोनी, कोमल कोळी, पूजा शेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.