पनवेल दि.2: गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सतत माणसांमध्ये रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वत्र फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून नागरिकांसाठी आरोग्यदायी उपक्रमे पार पडली. वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल १ लाख १० हजार मास्कचे मोफत वाटप, रक्तदान शिबिरे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अलबम ३० गोळ्यांच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबरीने अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप, भोजन वाटप, फळे वाटप, तसेच स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. या उपक्रमांत त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊनउपक्रम यशस्वी केले.
फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून झालेल्या या समाजोपयोगी उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल परिसरातील किमान ८० हजार नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या देण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून तब्बल ०१ लाख १० हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचबरोबरीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अलबम ३० या गोळ्यांच्या ०१ लाख २० हजार बाटल्यांचे वाटप भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आले. मास्क व रोगप्रतिकारक औषध भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागात व विभागात नागरिकांना वाटप केले.
कोरोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल, नवीन पनवेल, कर्जत, उरण, खारघर, सुकापूर, उरण, आदी ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नवीन पनवेल प्रभाग क्रमांक १६ व भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर यांच्यावतीने नवीन पनवेल येथील कर्नाटक संघ हॉलमध्ये झालेल्या शिबिरात ७७ रक्तदात्यांनी, पनवेल तालुका भारतीय युवा मोर्चा व धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था यांच्यावतीने सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कुल येथे झालेल्या शिबिरात ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रभाग क्रमांक १४, १८ व १९ च्या वतीने रक्तदान शिबीर झालेल्या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी, खारघर येथे झालेल्या शिबिरात २० रक्तदात्यांनी, भारतीय युवा मोर्चा कर्जत मंडलाच्या वतीने श्री. कपालेश्वर मंदिर येथे झालेल्या शिबिरात ३४ रक्तदात्यांनी, साई ब्लड बँक येथे झालेल्या शिबिरात ११ रक्तदात्यांनी, खांदा कॉलनी येथील रोटरी ब्लड बँकेत २५ रक्तदात्यांनी, खांदा कॉलनी येथील शिबिरात ३४ जणांनी तसेच दोन दिवसापूर्वी उरण युवा मोर्चाच्यावतीने झालेल्या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी असे एकूण ४२६ रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेली अनेक वर्षे जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर या जागतिक संकटातही गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. अशा वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेने आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व त्यांच्या सहकार्यांनी ८२ हजारहून अधिक नागरिकांना अन्नधान्याचे घरपोच वाटप केले. त्याचबरोबरीने मोलमजुरी, तसेच हातावर पोट असलेल्या गरजूंना मोदी भोजन कम्युनिटी किचन माध्यमातून ०१ लाख २५ हजारहुन अधिक तयार जेवणाचे वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप असो वा मास्कचे वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांची कोरोनासंबंधित हर एक गरज भागवण्याचा प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहे. कुणीही गरजू लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समोरून रिक्त हस्ते परतत नाही. कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटकाळातही लोकनेते रामशेठ ठाकूर शक्य तितक्या अधिकाधिक लोकांपर्यंत सर्व प्रकारची मदत पोहचवण्याचा प्रयास करीत आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर हे एखाद्या आधारवडासारखे जनतेच्या पाठीशी उभे आहेत. सध्याच्या कोरोना संकटामुळे आपल्या वाढदिवसाचा सोहळा न करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि वाढदिवस घरगुती ते पण साध्या पद्धतीने साजरा झाला मात्र समाजात गरज लक्षात घेऊन मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या, अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिरे असे आरोग्यदायी उपक्रमे संपन्न होऊन नेहमीप्रमाणे समाजाच्या हिताचा वाढदिवस साजरा झाला. सामजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, पत्रकारिता, साहित्यिक, लेखक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, सामजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी अशा हजारो जणांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दूरध्वनी, सोशल मिडियाच्या माध्यमातून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.