मुंबई 18 : काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत आणि सन्मान केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली. त्यानिमित्त त्यांचा पदग्रहण सोहळा आज मुंबई येथे मातोश्री बिर्ला सभाग्रृहात झाला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आवर्जून उपस्थित होते. काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेक्षाध्यक्षांचा सन्मान महेंद्रशेठ घरत यांनी केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, खासदार प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे, वसंत पुरके, भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाल्याने निश्चितच काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस येतील. काँग्रेस हा सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे. येणारा काळ हा काँग्रेसचाच असेल.- महेंद्रशेठ घरत, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!