पनवेल दि.१४: ‘महामानव’, ‘भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार’, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज साधेपणाने साजरी केली गेली. बाबासाहेबांची ही 130 वी जयंती. सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अति संसर्गजन्य परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता, या वर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहरातील बस आगार जवळ असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह विविध संघटना, संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!