पनवेल दि.१३: पनवेल परिसराचा आणखी विकास, तसेच सर्वसामान्य नागरीकांच्या आशा पुर्ण करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारच सत्तेत यायला पाहिजे. त्यामुळे पनवेलकरांच्या अपेक्षांच्या अनुरुप विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि तुमचे पाठबळ मला द्या, असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यानी कळंबोली मध्ये झालेल्या भव्य प्रचार रॅलीवेळी केले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार जोरदार पद्धतीने संपुर्ण मतदार संघात सुरु आहेत. महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा आपणच उमेदवार समजून आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० मध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा आणि मतदारांनी विजयी आशीर्वाद दिला. या रॅलीतसुद्धा तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या रॅलीत शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, आरपीआयचे शहराध्यक्ष मोहन बलखंडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष तुकाराम सरक, भाजपाचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका मोनिका महानवर, माजी लिजल्हा परिषद सदस्या प्रिया मुकादम यांच्यासह सेक्टर प्रमुख, बिल्डिंग प्रमुख, युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔸वासुदेव म्हणतोय, ‘मतदान करा तुम्ही मतदान करा’ …

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!