पनवेल दि.२६: आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पनवेल शहरातील वाहतूक विषयी भविष्यात अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणारा गाढी नदीवरील वडघर येथील ब्रिटिशकालीन बंद असलेला धोकादायक पुल पाडून त्या ठिकाणी नव्याने पुल उभारावा, ही पनवेल संघर्ष समितीची मागणी सिडकोच्या विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य परिवहन दळणवळण नियोजनकार सोमा विजयकुमार यांनी मान्य केली. त्यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दुपारी पुलाची पाहणी करून हा निर्णय घेतला. महाड येथील सावित्री पुल दुर्घटनेनंतर गाढी नदीवरील वडघर पुल वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने धोकादायक घोषित करुन कायमस्वरूपी बंद केला आहे. दरम्यानच्या काळात गाढी नदीवरील वडघर पुल ते गव्हाणफाटा रस्ता विमानतळासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने सिडकोकडे मालकी हक्क अबाधित ठेवून हस्तांतरणाचा करार केला. मात्र, सिडकोने पुल वगळून रस्ता ताब्यात घेतला. पर्यायी पुल शेवटच्या घटका मोजत उभा आहे. याबाबत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सिडकोचे संबंधित अधिकारी दह्यातकर यांच्याशी संपर्क साधला असता यांनी कुलकर्णी यांच्याकडे अंगूलीनिर्देश केला. त्यांनीही स्पष्टपणे हात वर केले. त्यानंतर विमानतळ प्रकल्पाचे मुख्य परिवहन दळणवळण नियोजनकार सोमा विजयकुमार यांच्याकडे संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पत्रव्यवहार करून पुल उभारणीची मागणी केली. त्यांच्या भेटीची वेळ घेवून सिडको कोकण भवन कार्यालयात रितसर भेट घेवून पुलाच्या उभारणीची उपयुक्तता पटवून दिली. सोमा विजयकुमार यांनी, बैठकीत उपस्थिती केलेल्या प्रश्नांना मुद्देसुद उत्तरे देवून सिडको आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पुल आणि रस्ता हस्तांतरणाच्या कराराची कागदपत्रे कडू यांनी त्यांना सुपूर्द केली. त्याशिवाय त्यातील प्रत्येकात अटीवर बाजू मांडून पुल उभारणीची गरज, विमानतळ आणि पनवेल शहराच्या भविष्याची सांगड घालून कडू यांनी युक्तिवाद केला. बैठकीत ठरल्याप्रमाणे आज, गुरुवारी (ता. 26) सकाळी 11:30 वाजता विमानतळ प्रकल्पाचे मुख्य परिवहन दळणवळण नियोजनकार सोमा विजयकुमार, वरिष्ठ परिवहन अधिकारी गीता पिल्ले, सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रफुल्ल ओहळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेश काटकर आदींनी वडघर येथे येवून पाहणी केली. त्यांच्या सोबत संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, मंगळ भारवड, रामाश्री चौधरी, शर्वाय कडू, कमलाकर भोईर, किरण पवत आणि कोळीवाड्यातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!