पनवेल दि.२६: पनवेल महापालिका सभागृह नेते परेश रामशेठ ठाकूर यांच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय केईआयएसई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी च्या वतीने डॉक्टरेट ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार २७ डिसेंबर रोजी श्रीलंकेत होणाऱ्या पदवीदान समारंभात ही पदवी त्यांना बहाल केली जाणार आहे. परेश ठाकूर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांनी विविध संस्था तसेच राजकीय महत्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. ते विविध उपक्रमांमध्ये सहभागी होवून संबंधित संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देतात. अनेकांना मदतीचा हात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिला आहे. पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. परेश ठाकूर हे सभागृह नेते असून त्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतात. घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक निर्मुलन त्याचबरोबर प्रक्रिया झालेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर या पर्यावरण विषयक विषयांवर त्यांनी आग्रही भूमिका घेतली. त्याचबरोबर याकरीता पुढाकारही घेतला. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य आदर्श व उल्लेखनीय असल्याने त्यांच्या अनेक कामांची दखल केईआयएसई या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने घेत परेश ठाकूर यांना डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!