पनवेलकरांचा फेस्टिव्हल ठरलेला रोटरी फाऊंडेशनचा ‘पनवेल फेस्टिव्हल’ शुक्रवारपासून सुरू झाला असून. या फेस्टिवल मध्येहि खरेदी साठी विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉन व्हेज स्टॉल्स,मुलांसाठी खेळण्याची साधने, आणि दररोज स्थानिक कलाकारांचे तसेच नामवंत कलाकारांचे मनोरंजनाचे भरपूर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रोटरी क्लबच्या सदस्यांनी सुरू केलेला पनवेल फेस्टिव्हल यंदा २४ वर्षांत पदार्पण करीत असून, छोटेखानी स्वरूपात सुरू केलेल्या फेस्टिव्हलने व्यापक रूप प्राप्त केले आहे. दररोज देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पदार्थांचे, अनेक वस्तूचे स्टॉल्स या फेस्टिव्हलमध्ये असतात.