उरण दि 19 (विठ्ठल ममताबादे) सगळीकडे दिवसेंदिवस डोंगर जळत आहेत.हजारो वृक्ष आणि वन्यजीव जळून खाक होत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उकाड्याने सर्वच त्रस्त झाले आहेत.उकाड्याने पाण्याची पातळी पण कमी होत आहे. मानव पाण्याच्या शोधार्थ दुसरीकडे गेला तर त्याची शिकार होणार नाही, परंतु वन्यजीवांनी आपली जागा बदलली तर त्यांच्या जीवितास नक्कीच धोका संभवतो. वन्यजीवांची ही तहान भागविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) संस्थेने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी पाणवठा तयार करण्याचा संकल्प केला आहे.
या संकल्पानुसार उरण पूर्व विभागातील फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर – उरण, रायगड यांनी गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही शुक्रवार दि.18 मार्च 2022 धुळवडीच्या दिवशी वन्यजीव आणि पक्षी यांची तहान भागविण्यासाठी चिरनेर पोंडा वनपरिक्षेत्रातील दगड मातीने भरलेला निसर्ग निर्मित झरा पुनर्जीवित करण्याचे महत्कार्य केले. या कार्यासाठी संस्थेचे संस्थापक जयवंत ठाकूर, अध्यक्ष राजेश पाटील, शेखर म्हात्रे, राकेश शिंदे, सृष्टी ठाकूर, अनुज पाटील, तुषार कांबळे, प्रणव गावंड, सचिन घरत आणि चरण पाटील या सर्वांनी मोलाचे योगदान दिले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!