पनवेल दि.२३ : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने सहा वाहनांना धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.
काल सोमवार दि.22 मे रोजी रात्री 11.15 वाजताच्या सुमारास पुण्याहून मुंबईला जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्या कंटनेरने सात वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की ज्या वाहनांना धडक दिली त्यातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोचली. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले.
अपघात करून पळून जात असताना खालापूर टोल नाका येथे चालकास पकडून खोपोली पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
