पनवेल दि. 22 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आणि आगरी कोळी, कराडी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे याला सोलापूर येथून अटक केली आहे. दुसर्‍या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह व अपशब्द पोस्ट करून धार्मिक भावनांचा अपमान केल्याप्रकरणी पनवेल कोळीवाडा येथील किरण पवार यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या आदेश व सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले, अविनाश पाळदे, मिलिंद फडतरे यांनी सायबर व तांत्रिक पद्धतीने केला. त्यांनी आरोपी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे (वय 36, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याची माहिती काढून पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे व पथक यांच्याशी समन्वय साधून आरोपीला सोलापूर येथून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!