पनवेल तालुका पत्रकार महासंघाचा अनोखा उपक्रम
नवीन पनवेल दि.९: पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार तथा दैनिक रायगड नगरीचे मुख्य संपादक सुनिल पोतदार आणि जेष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील आणि श्री भगवती साई संस्थानचे अध्यक्ष खेमचंद गोपलानी, सचिव रामलाल चौधरी यांच्या नियोजनाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार महासंघ आणि श्री भगवती साई संस्थान यांच्यावतीने पनवेल येथील कुष्ठरूग्ण वसाहतीत अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर, अध्यक्ष रत्नाकर पाटील, जेष्ठ पत्रकार, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, दैनिक किल्ले रायगडचे प्रतिनिधी प्रदिप वालेकर, रायगड शिव सम्राटचे प्रतिनिधी सुभाष वाघपंजे, वतन कर्नाळाचे प्रतिनिधी शेखर भोपी, गणेश कुष्ठरोग सेवा संघाचे सचिव अध्यक्ष अशोक आंबेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील म्हणाले की, कुष्ठरूग्ण कुटुंबीयांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे धान्य वाटप करून अल्पसा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर म्हणाले की, आपण आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहून जागतिक महिला दिन साजरा केल्याबद्दल आम्ही समाधानी असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी उपस्थित पत्रकारांचे गणेश कुष्ठरोग सेवा संघाचे सचिव अध्यक्ष अशोक आंबेकर यांनी गुलाबपुष्प आणि पेन देऊन स्वागत केले.