पनवेल दि.२२: रयत शिक्षण संस्थेच्या दापोली विद्यालयाच्या इमारतीचे काम निधी अभावी थांबलेले असताना, विद्यालयाला शुभांगी महेंद्र घरत यांच्या नावे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत २५ लाखांचा निधी तातडीने उपलब्ध करून इमारतीचे काम प्रगती पथावर आणले. अचानक कोर्ट स्टेमुळे, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वादामुळे पुन्हा ७ ते ८ महिने इमारतीचे काम थांबल्यामुळे शेकडो विद्यार्थी खोलीविना वर्गात शिकत आहेत. याच्यावर मार्ग काढा अशी आर्त साद विद्यालयाच्या प्राचार्या पुष्पलता मॅडम यांनी “कर्मवीर जयंती” च्या कार्यक्रमात सर्व उपस्थित नेत्यांना घातली. शेवटी स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रकाश जितेकर यांच्या नेतृवाखाली कामगार नेते, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट घेतली. आम्ही अनेक नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून मार्ग निघत नाही, आपण आशेचा शेवटचा किरण आहात. “सुखकर्ता“ शेलघर येथे गाऱ्हाणे घेऊन आलेला कोणीही निराश होवून परत जाणार नाही याची नेहमीच महेंद्र व घरत कुटुंबिक काळजी घेत असतात. त्याप्रमाणे महेंद्र यांनी कोर्टातून स्टे आणणाऱ्या शेतकऱ्या सोबत दीर्घचर्चा करून मार्ग काढला व त्याचे समाधान होईल असा तोडगा काढला व नूतन इमारतीच्या बांधकामाला शेतकऱ्यानी हिरवा सिग्नल दिला तर कोर्टातून स्टे ही मागे घेण्याचा शब्द दिला. प्राचार्य व स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी 35 लाखाची वाढीव निधी शुभांगीताई घरत यांच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय महेंद्र घरत यांनी घेतला.