पनवेल, दि.२२ (संजय कदम) आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या मार्फत एरिया डॉमिनेशन आणि रुट मार्च पनवेल शहरात तसेच करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह सीआयएसएफचे अधिकारी व कर्मचारी, जवान, आदींच्या पथकाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणी येथे पायी भेटी देवून तेथील परिसराची व परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. अशाच प्रकारे करंजाडे वसाहतीमध्ये सुद्धा पायी भेटी देवून परिसराची माहिती घेण्यात आली तसेच मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसह पोलीस पाटील आदी सहभागी झाले होते.

🛑Navi Mumbai Airport Flight Testing
🔸नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान
🔹भारतीय वायुदलाच्या सी 295 विमानाचं यशस्वी लँडिंग

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!