पनवेल दि.२६: सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांची भक्कम पायाभरणी करणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज, २६ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता पनवेलमध्ये एक प्रेरणादायी समता मार्च काढण्यात आला.
हा मार्च केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांवरील विचारांची सशक्त अभिव्यक्ती होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अभिवादन करून सुरू झालेला हा मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वडाळे तलाव, सावरकर चौक मार्गे तुकाराम महाराज स्मारक येथे पोहोचला, जिथे शाहू महाराजांच्या गीतांनी आणि घोषणांनी सांगता झाली.
या समतेच्या वाटचालीचे आयोजन महाराष्ट्र अंनिस – पनवेल शाखा, संविधान प्रचारक, मिशन माणुसकी, आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले.
![]()
