मुंबई दि. १३: महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विविध कार्लयाने माघील दोन महिन्यापासून वीजचोरांविरूद्ध धडक मोहीम राबवली असून महावितरणच्या पनवेल ग्रामीण विभागातील विशेष पथकाने माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ मध्ये तब्बल ६३ वीजचोरी उघडकीस आणून रु. १४,५१,२५० ची वसुली केली आहे. सातत्याने वाढत चाललेली वितरण हानी ही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वीजचोरीमुळे होत असल्याने भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता, श्रीमती पुष्पा चव्हाण व पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री.दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ग्रामीण विभागातील सर्व उपविभागांतर्गत वीजचोरी विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली आहे. वीज कायदा कलम अनुसार, या मोहिमेत कर्जत विभागातील नेरळ, कळंब, दहिवली उपविभागात एकूण १५ चोरीचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये एकूण रु. ४७,९३,२० ची वीजचोरी आढळली असून रु.३९,५९,७० वसूल करण्यात आले आहे. तसेच खोपोली उपविभागामध्ये हाळ, खोपोली, वावोशी भागात १० वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले यामध्ये एकूण रु.२७,५६,८० वसूल करण्यात आले. खालापूर उपविभागामध्ये आसरे,धारणी व लगतच्या गावामध्ये ७ वीज चोरीच्या प्रकरणात रु.८४,९९० वसूल करण्यात आले व पनवेल-२ उपविभगात आपटा, साई, चावणे, रिस व कोळखे इत्यादी गावांमध्ये सर्वाधिक ३१ वीजचोरीचे प्रकार उघडकीस आले असून एकूण रु.६७,४६,१० वसूल करण्यात यश आले.