मुंबई दि.14: (किशोर गावडे) संगीत भजन हा सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिंगत करण्याचा संतांनी दिलेला एक उत्तम ठेवा असून याद्वारे श्री रामेश्वर प्रा.भजन मंडळ,भांडुप मुंबई,भजन सम्राट वै. काशीराम परब बुवा यांचे शिष्य बुवा मंगेश चं आंबेरकर यांच्या सारखे भजनी कलावंत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावून याचा प्रचार व प्रसार करीत असून त्यांचं हे कार्य कौतुकास्पद असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते व भजनप्रेमी विजय दुदवडकर, जेष्ट गुरुबंधू बुवा चंद्रकांत देसाई आणि मान्यवर भजनसम्राट यांनी नुकतेच भांडूप येथे व्यक्त केले. यावेळी नामवंत भजनी कलावंत व भजनप्रेमी,पखवाज वादक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
रौप्यमहोत्सवी दिनानिमित्त भजनसम्राटांची अभंगवाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भजन सम्राट लक्ष्मणजी गुरवबुवा, भगवानजी लोकरेबुवा, रामदासजी कासलेबुवा,नेरुळ नविमुंबईतून नेरुळ भूषण, अमृतजी हंसाराम पाटीलबुवा, नेरुळकर,, नारायणजी वाळवेबुवा, गोपिनाथजी बागवेगुरुजी, श्रीधरजी मुणगेकरबुवा, प्रमोदजी हर्यानबुवा, प्रमोदजी धुरीबुवा, संतोषजी लाडबुवा या नामवंत भजनि सम्राट कलावंतांनी संतांच्या प्रासादिक रचना सादर करुन मैफिलीत रंग भरला. वै. भजन सम्राट काशीराम परबाबुवा यांचे शिष्य,श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा मंगेश चंद्रकांत आंबेरकर यांनी भजन ही भक्ती, ईश्वरसेवा असून भजनाची सात्विकता जपण्याचा आशावाद व्यक्त केला. तसेच पंचवीस वर्षे भजनरुपी सेवा करण्याचे योगदान हे आम्हा सभासदांचे नसून आमच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक सभासद परिवाराचे हे श्रेय आहे असे मत व्यक्त करून,सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गावडे यांनी केले तर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रवि जाधव उभयतांनी उपस्थितांचेआणि मान्यवर उभयतांचे यथोचित आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ परिवाराने विशेष मेहनत घेतली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!