तळेगाव दि.21 (अमीन खान) ‘बकरी ईद’ नावाने फक्त भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानात प्रचलित आहे. मात्र जगभरात *ईद अल-अज़हा* नावानेच उल्लेखला जातो. त्याचा
खरा अर्थ ‘कुर्बानीचा सण’!
कुर्बानी म्हणजे कोणा जीवाची नाही, तर त्यागाची. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, पालनपोषण केले, सुरक्षित ठेवले आणि खस्ता खाल्ल्या आशा सर्व परोपकारी लोकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी *परमोच्च त्यागाची तयारी ठेवावी, हा खरा संदेश* या सणाच्या निमित्ताने देण्याचा मूळ उद्देश कुराण शरीफ ग्रंथातील कथेत दिला आहे. कारण ज्याप्रमाणे अल्लाह, ईश्वर, देव, गॉड, प्रभू, भगवान, दाता,  किंवा विश्वनिर्माता याने सारी सृष्टी निर्माण केली आणि तिचे पालनपोषण केले, करत आहे त्याचप्रमाणे आईवडील आणि समाजातील अनेकांच्या उपकारांमुळे आपले जीवन आहे।
अल्लाहला बकऱ्याची कुर्बानी देणे हे केवळ प्रातिनिधिक आहे. प्रथा म्हणून ठीक आहे. परंतु खरी कुर्बानी ही कुटुंब आणि समाजासाठी त्यागाची भावना प्रत्यक्षात जोपासण्याची असायला पाहिजे!
(माझ्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतून मी हे विश्लेषण करू शकलो.)
ईदच्या मनापासून शुभेच्छा!

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!